संत तुकाराम महाराजांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Information In Marathi

Sant Tukaram Information In Marathi जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या ओळी कानावर पडल्या की आपल्याला संत कवी तुकाराम महाराज यांची आठवण होते .आपल्या अभंग वाणीने अखंड इंद्रायणी तीर भक्तीमय करणा ऱ्या आणि अवघ्या महाराष्ट्राला विठ्ठल भक्तीत लीन करणाऱ्या अभंगांचे रचिते संत तुकाराम महाराज सतराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेले.

Sant Tukaram Information In Marathi

संत तुकाराम महाराजांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Information In Marathi

संत तुकाराम महाराजांची प्राथमिक माहिती:-

इंद्रायणी काठच्या पवित्र देहू या गावी आंबिले कुटुंबात 22 जानेवारी 1608 अर्थातच माघ शुद्ध पाच शके पंधराशे अठ्ठावीस रोजी संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या मातापित्यांचे नाव बोलहोबा आणि कनकाई होते. बालपणापासूनच विठ्ठलाची अनामिक ओढ असणाऱ्या संत तुकाराम महाराजांना जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त पांडुरंग आणि पांडुरंग दिसे. अशा या थोर संत महात्म्यांबद्दल आपण माहिती घेऊया.

पूर्ण नावतुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्मसोमवार 21 जानेवारी 1608
जन्मस्थानदेहू, महाराष्ट्र
निर्वाण शनिवार 19 मार्च 1650
संप्रदायवारकरी संप्रदाय
शिष्यसंत निळोबा , संत बहिणाबाई, भगवानबाबा
वडीलबोल्होबा अंबिले
आईकनकाई बोल्होबा आंबिले
पत्नीआवली
कार्यसमाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक

संत तुकाराम महाराजांची कथा:-

देहू या पावन तीर्थक्षेत्रामध्ये एका थोर घराण्यात विठ्ठल भक्त संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. संत तुकारामांचे आराध्य दैवत म्हणायचे झाले तर पंढरपूरचा विठ्ठल व रुक्मिणी होय .संत तुकाराम महाराजांच्या मनाची अवस्था ही अशी झाली होती की त्यांना सर्वत्र फक्त पांडुरंग दिसायचा. ध्यानी मनी स्वप्नी त्यांच्या पांडुरंग वसे. पण विठ्ठलाचे पहिले भक्त हे संत तुकाराम महाराज मुळीच नव्हते. संत तुकाराम महाराजांना हा विठ्ठल भक्तीचा वारसा त्यांच्या पूर्वजांकडून प्राप्त झाला होता.

संत तुकाराम महाराजांची आई कनकाई आणि त्यांचे वडील बोलहोबा हे स्वतः खूप मोठे विठ्ठल भक्त होते. त्यांनी आपलं उभा आयुष्य विठ्ठलभक्ती वारकरी संप्रदाय, हरिनामाचे स्मरण व साधुसंतांची सेवा यात लीन केलेले होते .वडिलांकडून त्यांना हीच शिकवण मिळाली होती ,की महिन्याच्या वारीला पंढरपूरला जायचे तिथे विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे व चंद्रभागेमध्ये स्नान करून नगर प्रदक्षिणा घालावी, हेच संस्कार त्यांच्या मुलांनी देखील जोपासले.

संत तुकाराम महाराज यांचे दोन भाऊ म्हणजेच सावजी आणि कानोबा आपल्या आई-वडिलांमुळे या तीनही भावंडांना विठ्ठल भक्तीचा वेड हे लहानपणापासूनच होतं .तुकाराम महाराजांच्या घरी शेती, गुरेढोरे होती. संत तुकाराम महाराज हे खूप खेळकर वृत्तीचे होते. लहानपणी आपल्या भावंडांसोबत नदी काठावर गेले असताना पाण्यात मस्ती करणे आपल्या वयाच्या मुलांसोबत पाण्यात पोहणे तेथेच आजूबाजूला असलेल्या वडपिंपळाच्या मोठ्या झाडांवर झोके घेणे हे त्यांचे आवडते काम होते .

संत तुकाराम महाराजांची लहानपणापासूनच वृक्ष झाड वेली व आजूबाजूच्या हिरवळीवर अतोनात भक्ती होती .ही सगळी ईश्वराचीच म्हणजेच पांडुरंगाचीच देण आहे असे ते मानत असे म्हणूनच त्यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें” आणि “पक्षीही सुसरे आळविती” हे काव्य रचले. संत तुकाराम महाराज हे संत शिरोमणी नामदेवांचा अवतार आहे असे मानले जाते, अशी अख्यायिका आहे की संत नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग लिहिण्याचा संकल्प रचला होता .

त्याबाबतीत कथा अशी आहे की घरातील म्हणजेच संत नामदेवांच्या घरातील 14 ही माणसे रात्रंदिवस अभंग लिहायला बसले होते व स्वतः त्यांच्या मदतीला पांडुरंग ही अभंग लिहायला बसला होता. 96 कोटी अभंग लिहून पूर्ण झाले पण चार कोटी अभंग हे अपुरेच राहिले तर असे मानले जाते की ते चार कोटी अभंग पूर्ण करण्यासाठी पृथ्वीतलावर नामदेवांचा अवतार घेऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला.

संत तुकाराम महाराजांचा जीवनप्रवास:-

तर संत तुकारामांच्या बाबतीत असे सांगता येते की त्यांचा जन्म झाला व कळत्या वयात त्यांचे वडील हे स्वर्गवासी झाले .त्यामुळे सगळ्या घरादाराचा व संसाराचा गाडा संत तुकारामांच्या पाठीवर आला. त्याच वेळी आप्पाजी गुळवे हे पुण्याचे रहिवासी होते त्यांची कन्या जिजाबाई म्हणजेच आवली तिच्याशी संत तुकाराम महाराज हे विवाहबद्ध झाले. संत तुकाराम महाराज यांना चार मुले होती. त्यात दोन मुली व दोन मुले अशी त्यांची आपत्य होती.

संत तुकारामांची कन्या भागीरथी व काशी तर त्यांची मुले नारायण आणि महादेव अशी होती. तुकारामांचा परंपरागत व्यवसाय हा सावकारीचा होता .त्यांचे वडील हे सावकार होते. पण सावकारी कशी करायची ,पैसा कसा कमवायचा ,वडिलांचा व्यवसाय पुढे कसा न्यायचा याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.

संत तुकाराम महाराज यांना ऐश्वर्याचा धनसंपत्तीचा काडी मात्र ही रस नव्हता. त्यांना असं वाटत असे की जर आपण धनसंचय केला तर तो लोकांचा तळतळात घेऊन कमावलेला पैसा आपल्याला देवापर्यंत कधीच पोहोचू देणार नाही. त्याच वर्षी भयंकर दुष्काळाने लोकांना ग्रासले होते. त्याचवेळी संत तुकाराम महाराजांनी एक वेगळीच कृती केली .ज्यामुळे संपूर्ण जीवसृष्टीला त्यांचा अभिमानच वाटला. त्यांनी आपली सारी संपत्ती गावातल्या लोकांनी मध्ये वाटून टाकली.

लोकांना सावकारीच्या पैशातून संत तुकाराम महाराज यांनी मुक्त केले. त्यांनी जमिनीची गहाण ठेवलेली कागदपत्रे देखील इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिली .संपूर्ण गावातील लोकांची कर्जमाफ करणारे संत तुकाराम महाराज हे पहिले संत होऊन गेले .म्हणूनच संत तुकाराम महाराजांची ख्याती ही संपूर्ण जगामध्ये नावलौकिक झाली .म्हणूनच संत तुकारामांना अशी उपाधी दिली जाते की तुका आकाशाएवढा. त्या संदर्भात काव्यपंक्ती अशा आहेत की ,

अनुरेनिय थोकडा  तुका आकाशाएवढा .

संत तुकाराम महाराजांचे कार्य:-

संत तुकाराम महाराज यांचे पुढील आयुष्य हे थोडे खडतर व त्यांना थोडे दुःख भोगावे लागले. आयुष्यात पुढे प्रवचने व कीर्तने रचत असताना त्यांना अभंगाची देखील रचना जमायला लागली. आयुष्यात एवढे दुःख सहन करत असताना देखील त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विठ्ठलावरची आपली भक्ती कमी केली नाही. ती त्यांनी अपार चालूच ठेवली.

देहू गावाजवळ एक भंडारा नावाचा डोंगर होता तेथे संत तुकाराम महाराजांनी आपली उपासना चालूच ठेवली व स्वतःचे सारे प्रवचने कीर्तन अभंग यांचे साहित्य जमवायला सुरुवात केली. त्याचवेळी चिरंतन ते विठ्ठलाचे नामस्मरण करत असताना त्यांना साक्षात्कार झाला व लोकांमध्ये अशी आख्यायिका मानली जाते की तेथे उपासना करत असताना त्यांना विठ्ठल भेटला असे मानले जाते .

संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये देखील ईश्वर भक्तीचे बीज रोवले. तसेच सतराव्या शतकामध्ये प्रबोधन करणारे व समाज सुधारक अशी त्यांची ख्याती प्रसिद्ध झाली. व त्यांनी प्रबोधनातून समाजाचे हित घडवून आणण्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले .

संत तुकाराम महाराज यांनी अनेक अभंगासोबत काही गवळणी ही रचलेल्या आहेत. त्यांच्याकडे असणारे काव्यरचनेचे ज्ञान हे अमुलाग्र होते. त्यांची ही अभंग व काव्यरचना सामान्य माणसाच्या सतत मुखात प्रभू चे ध्यान करताना किंवा देवाच्या भक्तीत लीन होताना कायम असायची.

संत तुकाराम महाराजांविषयी आख्यायिका:-

रामेश्वर भट हे पुण्याजवळील वाघोली गावातील रहिवासी होते. संत तुकाराम महाराजांनी संस्कृत मधील अवघड श्लोक काव्यरचना व अभंग जे सामान्य लोकांना समजत नाही ते मराठीतून समजून सांगण्याचा प्रयत्न केला. व लोकांच्या मनामध्ये विठ्ठलाच्या भक्तीचे बीज रोवले.

हे रामेश्वर भटांना बिलकुल आवडले नाही त्यामुळे त्यांनी तुकाराम महाराजांची अभंगाची गाथा इंद्रायणीत बुडवण्याची त्यांना शिक्षा दिली. हे पाहून सर्व लोक हळूहळू व्यक्त करत होते. त्याचवेळी इंद्रायणी नदीच्या काठी लाखोंचा जनसागर लोटला होता. पण लोकांना तुकाराम महाराजांचे अभंग इतके अंगवळणी पडले होते की लोकांनी इंद्रायणीच्या काठीच एकाच सुरात गाथेतील अभंग म्हणायला सुरुवात केली हे पाहून संत तुकाराम महाराज खूप भारावून गेले.

संत तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग गाथा जरी इंद्रायणीत बुडाली असली तरी ती जनमानसामध्ये इतकी रुजलेली आहे की ती कधीच बुडली जाणार नाही. किंवा विसरली देखील जाणार नाही. हेच पाहून रामेश्वर भटांना आपल्या चुकीची जाणीव झाली व रामेश्वर भटांनी संत तुकाराम महाराजांची आरती देखील लिहिली.

संत तुकाराम महाराजांचे वैकुंठवास:-

खरंतर आठव्या पिढीतील तुकाराम महाराज हे खरे नायक ठरले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेले काव्य व त्यांच्या भक्तिमय चळवळीला खऱ्या अर्थाने मूर्तिरूप कळस देण्याचे काम संत तुकाराम महाराजांनी केले. त्यांनी त्यांच्या काळामध्ये समाज सुधारकाचे देखील काम केले.

त्यांनी आपल्या काव्यपंक्तींमधून समाजातील रूढी परंपरा, वाईट प्रथा, तसेच अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला, व ते लोकांना पटत देखील गेले. आपण आता जो दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा करतो तो दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीयेचा दिवस .त्या दिवशी संत तुकाराम महाराज यांना सदेह वैकुंठ गमन झाले असल्याचे मानले जाते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:-

संत तुकाराम महाराजांचा जन्म कधी झाला?

सोमवार 21 जानेवारी 1608

संत तुकारामांची शिष्या कोण?

संत बहिणाबाई

संत तुकाराम महाराज बीज म्हणजे काय?

‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस.

संत तुकाराम महाराजांचा संप्रदाय कोणता होता?

वारकरी संप्रदाय

Leave a Comment