योगा ची संपूर्ण माहिती Yoga Information In Marathi

Yoga Information In Marathi मित्रांनो नमस्कार ,आजच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा धावपळीचे आयुष्य जगताना आपण पाहत आहोत. त्यामुळे धावपळीच्या या परिस्थितीत प्रत्येक माणसाने आपल्या तब्येतीची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे आहे. आजची परिस्थिती बघितली तर रक्तदाब, हृदयविकार यांसारखे आजार डोके वर काढायला लागलेले आहेत. वीस वर्षाच्या तरुण मुलांना सुद्धा हृदयविकाराचे झटके येत आहेत.

Yoga Information In Marathi

योगा ची संपूर्ण माहिती Yoga Information In Marathi

काही दिवसांपूर्वीच तर अशी बातमी होती की ,एका शालेय विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका आला. अजूनही परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली नाही. ही परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाण्याअगोदर प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक कुटुंबाने आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी सकस आहार घेतला पाहिजे .मुलांना या जंग फूड ऐवजी बाहेरील खाण्या व्यतिरिक्त घरातील पोळी, भाजी, डाळ ,भात हा सकस आहार दिला पाहिजे .

हा नियम फक्त मुलांसाठीच लागू न करता घरातील सर्वांना हा नियम लागू झाला पाहिजे. म्हणजेच सर्वांनी बाहेरील खाण्या व्यतिरिक्त घरातील सकस आहार घेतला पाहिजे .तसेच सकस आहार जसा आपल्या तब्येतीसाठी महत्त्वाचा आहे. त्याच बरोबरच व्यायामही हा खूप महत्त्वाचा आहे. व्यायाम हे बऱ्याच प्रकारचे असतात .

जसे की, काही लोक हे सकाळी फिरायला जातात. काही लोक जिमला जातात .काही लोक योगासने करतात .आज मी तुम्हाला असाच एक व्यायाम याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. हा एक व्यायामाचाच प्रकार आहे. तो म्हणजे योगा!!! आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला योगा बद्दल संपूर्ण माहिती, त्याचे महत्त्व व त्याचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे.

आपल्याला वाटेल की, योग म्हणजे योगासन किंवा शरीराचा व्यायाम शरीर तानने किंवा वाकवणे असे असेल पण तसे नाही. योग हा शरीराचा व्यायाम नसून हा एक विज्ञानाचा भाग आहे .जो मानवी मन आणि आत्मा यांची क्षमता जाणून घेणारे विज्ञान आहे .शरीर मन, आत्मा आणि विश्व या सर्व गोष्टी एकत्र करणारी गोष्ट म्हणजे योगा!! योगाचा इतिहास हा सुमारे 5000 वर्षांपूर्वीचा खूप जुना आहे.

प्राचीन काळात योगा म्हणजे मन आणि शरीराचा अभ्यास म्हणून ओळखले जात होते .योगामध्ये विविध शैली आहेत. जसे की, शरीराची मुद्रा, श्वास घेण्याची तंत्रे ध्यान व विश्रांती. अलीकडच्या काळात योगा हा एक शारीरिक व्यायाम म्हणून खूप लोकप्रिय झाला आहे. योगा हे जशा प्रकारे एक शास्त्र आहे त्याच प्रकारे एक कलाही आहे व विज्ञानही!!!

योगा हे एक असे माध्यम आहे जे शरीर व मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. “युज” या संस्कृत भाषेतील शब्दावरून योग या शब्दाचा उगम झाला आहे. याचा अर्थ आत्म्याचे परमात्म्यामध्ये विलीन होणे असा होतो.

योगाचा इतिहास

योगाचा उगम हा आपल्या आपल्या भारतातच झाला आहे असे मानले जाते .सर्वात प्राचीन लिखाणांपैकी भारतीय ऋषी पतंजली यांनी लिहिलेला “योगसूत्र” हा ग्रंथ सर्वात जुने लिखित नोंद आहे. हा ग्रंथ जवळपास 2000 वर्ष जुना आहे.

या ग्रंथाचा मुख्य हेतू म्हणजे आपण योगा मधून आपल्या भावना व मनावर नियंत्रण कसे ठेवायचे व त्यामधून आपला आध्यात्मिक विकास कसा साधावा हा आहे .तसेच या ग्रंथांमध्ये तत्वज्ञानावर भर दिलेला आहे. योगाचा उल्लेखा नारदीय सूक्त व ऋग्वेदात सुद्धा आढळतो. तसेच सिंधू संस्कृतीतही आपल्याला योगाचा उल्लेख दिसून येत आहे. सिंधू खोऱ्यात अजूनही योग मुद्रा, योगासनाचे प्रकार व त्याच्या आकृत्या या गुफा व दगडात कोरलेल्या आढळतात.

योगाचे महत्त्व व फायदे

आत्ताच्या या आधुनिक व धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. कारण का या धावपळीच्य युगामध्ये आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार ,लठ्ठपणा अशा अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. या सर्व आजारांवर मात करण्यासाठी योगा हा एक उत्तम मार्ग आहे .

योगा हा केल्यामुळे आपल्याला शारीरिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य ,सामाजिक आरोग्य, अध्यात्मिक आरोग्य व आत्मज्ञान अशा गोष्टी साध्य करता येतात .नुसतेच शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही त्याबरोबरच आपले मानसिक व भावनिक स्वास्थ सुद्धा चांगले राहिले पाहिजे म्हणून या सर्व गोष्टींसाठी योगा हा महत्त्वाचा आहे.

कारण योगा केल्यामुळे आपल्याला शारीरिक मानसिक व भावनिक तिन्ही प्रकारे स्वास्थ्य उपलब्ध होते. तसेच योगा केल्यामुळे मनुष्याचे शरीर निरोगी तर होतेच पण त्याला ऊर्जा सुद्धा मिळते. योगा केल्यामुळे आपल्या शरीरात रक्ताचे चांगल्या प्रकारे अभिसरण होते .त्यामुळे आपले सर्व अवयव चांगल्या प्रकारे कार्य करतात .शिवाय शरीराचे तापमान देखील नियंत्रित केले जाते.

जर रक्ताचा प्रवाह असंतुलित झाला तर हृदयाशी संबंधित आजार होतात .तसेच आपला मेंदू सुद्धा व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताचा चांगला प्रवाह होणे गरजेचे आहे. योगा केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह हा व्यवस्थित होत असतो. तसेच या धावपळीच्या जगात पुरेसा आराम व झोपेची कमतरता यामुळे बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशर यांसारखे आजार उद्भवायला लागले आहेत .

त्यामुळे प्राणायाम केल्याने शरीराला पर्याप्त ऊर्जा मिळते व मज्जातंतूचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होते. आजकाल आपण पाहतच आहात की सर्व सगळीकडे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. त्यामुळे श्वसन यंत्रणेतील कोणत्याही विकृतीमुळे आपण आजारी पडतो. तेव्हा आपल्याला अशा परिस्थितीत योगा जीवनात श्वास घेण्याचे महत्त्व काय आहे हे सांगतो. कारण प्रत्येक योगा श्वासावर आधारित असतो. जेव्हा आपण योगा करतो तेव्हा फुफ्फुस खूपच पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सुरुवात करते.

ज्यामुळे आपल्याला श्वासास्वास करणे सोपे जाते. आज काल अपचन ही समस्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला भासत आहे. ही समस्या मुख्यतः पाचक प्रणालीच्या आयोग्य कामकाजामुळे उद्भवत असते. यावर योग हा एक उत्तम मार्ग आहे. योगामुळे पाचन तंत्र सुधारते .ज्यामुळे बद्धकोष्ठता, वायू आणि आम्लता यांसारख्या समस्या मुळापासून दूर होऊ शकतात. तसेच रोज योगा केल्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते व आपल्या शरीरात होणाऱ्या वेदना सहन करण्याची शारीरिक क्षमता ही वाढते.

नियमित सरावानंतर वेदना कमी होण्यास सुरुवात होते. नियमित योग केल्यामुळे आपला थकवा दूर होतो व शरीरात नवी ऊर्जा भरली जाते .नियमित योगा केल्यानंतर आपले मन शांत होते. मानसिक व शारीरिक तणावातून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. व त्यामुळे आपल्याला रात्री झोप चांगली लागते व दुसऱ्या दिवशी शरीरास पुन्हा काम करण्यास ऊर्जा मिळते. हृदय हे आपल्या शरीराचा एक नाजूक व महत्त्वाचा भाग आहे. चुकीचा आहार, असंतुलित दिनचर्या व तणाव यांचा थेट परिणाम हा आपल्या हृदयावर होत असतो.

त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक रोग उद्भवतात व हे टाळण्यासाठी योगा हा एक उत्तम मार्ग आहे. नियमित योग व नियमित निरोगी खाण्यामुळे हृदय स्थिर राहते. आज-काल लठ्ठपणा म्हणजेच अतिरिक्त वजन वाढत आहे .हा लठ्ठपणा व अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी योगा हा खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. सूर्यनमस्कार ,कपालभाती, प्राणायाम हे योगाचे प्रकार केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढ होते योगा हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

योगाचे नियम

योगा करताना योगाचे काही नियम आहेत. त्यांचे पालन करणे ही तितकेच गरजेचे आहे .योगा हा नियमानुसार सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर केला पाहिजे. सकाळी लवकर योगा करणे हे अधिक फायदेशीर ठरते .सकाळी योगा हा रिकाम्या पोटी केला पाहिजे.

योगा करण्यापूर्वी हलका सराव करणे आवश्यक आहे जेणेकरून शरीर लवचिक होईल. प्रथम योगा करताना त्याची माहिती घेणे आवश्यक आहे किंवा प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली योगा करावा.संध्याकाळी योगा केला तर योगा केल्यानंतर अर्ध्या तासानंतरच काहीतरी खावे .योगा केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये .थोडावेळ थांबावे. आरामदायक कपडे घालूनच योगासने करावी.

आपण ज्या ठिकाणी योगा करीत असाल ती जागा स्वच्छ आणि शांत असावी. योगा करताना आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा .योगाचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे योगा करताना तो संयमाने करावा व कोणत्याही आसनामध्ये जास्त जोर देऊ नये .आपल्या क्षमतेनुसार ते करावे.

सर्व योगासने हे आपल्या श्वासावर अवलंबून असतात. त्यामुळे त्याचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रथम त्याबद्दल सर्व माहिती जाणून घ्यावी. योगाच्या शेवटी नेहमीच शवासन करावे. हे शरीर व मन पूर्णपणे शांतते करते. शवासन केल्यावरच योग पूर्णपणे फायदेशीर ठरतो. योगादरम्यान थंड पाणी पिऊ नये कारण योग करताना शरीर गरम असते .म्हणून थंड पाण्याऐवजी साधे किंवा कोमट पाणी प्यावे.

आजच्या या धावपळीच्या जगात आपण सर्वानी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.त्यामुळे आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर रोज नित्य नियमाने योगा करणे खूपच गरजेचे आहे. आपल्याला जर आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आनंदाने उपभोगायचा असेल तर योगा करून आपण आपले शरीर व मन दोन्हीही निरोगी ठेवू शकतो .

धन्यवाद!!!

FAQ

योग म्हणजे काय योगाचे महत्त्व स्पष्ट करा?

योगा म्हणजे शरीर, मन, व आत्म्याला एक करून वर्तमान काळात जगणे. बरेच जण योगाला हातापायाला ताण देऊन शरीर लवचिक बनवणारा शारीरिक व्यायाम समजतात. पण खरेतर योगा हा एक मानसिक व्यायाम आहे. जो मन शांत ठेवण्यास व माणसाची अंतर्भूत शक्ती वाढवण्यास मदत करतो.

योग किती आहेत?

मात्र काही योग प्रकारांचा आरोग्य, साधना किंवा मोक्ष प्राप्त करण्‍यासाठीही केला जाऊ शकतो. योगाचे सहा प्रकार मानले जातात. (1) राजयोग (2) हठयोग (3) लययोग (4) ज्ञानयोग (5) कर्मयोग व (6) भक्तियोग.

योगामुळे तुमच्या शरीरात कसे बदल होतात?

1. योगामुळे शक्ती, संतुलन आणि लवचिकता सुधारते . हळू हालचाल आणि खोल श्वास घेतल्याने रक्त प्रवाह वाढतो आणि स्नायू उबदार होतात, पोझ धारण केल्याने शक्ती निर्माण होते. एका पायावर संतुलन ठेवा, दुसरा पाय तुमच्या वासराला किंवा गुडघ्याच्या वर (परंतु कधीही गुडघ्यावर) काटकोनात धरून ठेवा.

योगासने तुमचे शरीर बदलण्यासाठी किती वेळ लागतो?

कालांतराने शरीरात होणारे बदल
जर तुम्ही सातत्याने सराव करत असाल, तर तुम्हाला शरीरातील काही सकारात्मक बदल लक्षात येऊ लागतील. शरीर आणि मेंदू योग ताई ची येथे, शरीरातील लक्षणीय बदल लक्षात येण्यापूर्वी आम्ही सरासरी तीन महिन्यांसाठी आठवड्यातून दोनदा योगाभ्यास करण्याची शिफारस करतो.

लोक योगा का करतात?

सर्व योग शैली तुमचे शरीर, मन आणि आत्मा संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात, परंतु ते विविध मार्गांनी साध्य करतात. काही योगशैली तीव्र आणि जोमदार असतात. इतर आरामशीर आणि ध्यान करणारे आहेत. तुम्ही कोणता प्रकार निवडता हे महत्त्वाचे नाही, योग हा तुमचे शरीर ताणण्याचा आणि बळकट करण्याचा, तुमचे मन केंद्रित करण्याचा आणि तुमचा आत्मा आराम करण्याचा उत्तम मार्ग आहे.

Leave a Comment