कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती Kabaddi Information In Marathi

Kabaddi Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपण आपल्याला लहानपणी बरेच खेळ  खेळलेलो आहोत. आपण बैठे खेळही खेळलो तसेच मैदानी खेळही खेळलेलो आहेत.आपण जे मैदानी खेळ खेळत होतो आज त्या पैकी बरेच खेळ हे आंतरराष्ट्रीय व जागतिक स्तरावर खेळले जात आहेत. आज आपण आजच्या पोस्ट मध्ये अशाच एका खेळाची माहिती पाहणार आहोत. तो खेळ आहे कबड्डी!!!!

Kabaddi Information In Marathi

कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती Kabaddi Information In Marathi

कबड्डी हा एक प्राचीन भारतीय खेळ असून तो भारतात व जगात सर्वत्र लोकप्रिय असा खेळ आहे. तसेच कबड्डी एक सांघिक खेळही आहे. कबड्डी हा बांगला देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. प्राचीन कुस्ती खेळांपैकी एक म्हणून कबड्डी या खेळाकडे पाहिले जाते.”काई – पीडी”या तामिळ शब्दापासून कबड्डी हा शब्दाचा उगम झालेला आहे. याचा अर्थ हात पकडणे असा आहे.

खेळाचे नाव कबड्डी
खेळाचा प्रकार मैदानी खेळ
खेळाडूंची संख्या7-7
कबड्डीचे प्रकार संजीवनी कबड्डी, जैमिनी स्टाईल, अमर स्टाईल, पंजाबी कबड्डी
भारतातील कबड्डी स्पर्धा प्रो कबड्डी लीग
उपनावकौडी, पकाडा, हादुदू, भवतिक, सादुकुडा, हुतुतू, हिमोशिका
मैदानाची लांबी व रुंदी (पुरुष)10 x 13 मीटर
मैदानाची लांबी व रुंदी (महिला)8 x 12 मीटर
रीडरला रेड करण्याची वेळ फक्त 30 सेकंदाची

भारतात बऱ्याच राज्यांमध्ये हा खेळ खेळला जातो परंतु पंजाब, तामिळनाडू ,आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ,महाराष्ट्र ,मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये कबड्डी हा खेळ जास्त लोकप्रिय आहे. तसेच प्रत्येक राज्यांमध्ये कबड्डीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.

उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये कबड्डीला चादूकट्टू, बांगलादेशमध्ये हद्दू, मालद्विप मध्ये भवतिक, पंजाब मध्ये कुड्डी, भारतामध्ये हु तु तू ,आंध्र प्रदेशांमध्ये चेडूगुडू, नेपाळमध्ये कपर्डी, महाराष्ट्रात,कर्नाटक व केरळमध्ये कबड्डी अशा वेगवेगळ्या नावांनी कबड्डीला ओळखले जाते. परंतु तामिळ शब्दापासून उगम पावणारा कबड्डी हा शब्द उत्तर भारतात खूप लोकप्रिय आहे.

कबड्डी खेळाचा इतिहास:-

कबड्डी हा खेळ भारतामध्ये 4000 वर्षापासून खेळला जाणारा सर्वात जुना खेळ आहे. काहींच्या मते या खेळाची सुरुवात महाभारतातील अभिमन्यूने केली. या खेळाची सुरुवात भारतामध्येच झाली म्हणजेच या खेळाचा उगम तामिळनाडू मध्ये झाला आहे. तुकारामांच्या अभंगात सुद्धा कबड्डी या खेळाविषयीचे वर्णन आहे .त्यांच्या अभंगात असे वर्णन आहे की, आमचा लाडका कृष्ण हा खेळ खेळला होता. तसेच पूर्वी राजकुमारी समोर आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी राजकुमार हा खेळ खेळत होते.

महाभारत या काळापासून कबड्डीला आपल्या भारतामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वीच्या काळी कबड्डी हा खेळ फक्त मनोरंजनासाठी खेळला जात नसून शारीरिक शक्ती व स्वतःचे सामर्थ्य वाढवण्यासाठी तसेच आत्मरक्षण वृत्ती वाढवण्यासाठी खेळला जात होता. 1918 मध्ये कबड्डी या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून दर्जा मिळाला. यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे.

1936 मध्ये बार्लीन ऑलिंपिक मध्ये या खेळाला जागतिक दर्जा प्राप्त झाला. 1938 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय खेळात कबड्डी या खेळाचा समावेश झाला. “ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनची” स्थापना 1950 मध्ये झाली व तेव्हा या खेळाला नियम लावले गेले .1972 मध्ये याच महासंघाची पुनर्रचना “अमैच्योर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया” या नावाने करण्यात आली.

पहिली राष्ट्रीय स्पर्धा ही चेन्नई येथे खेळली गेली. भारताबरोबरच जपान सारख्या देशात देखील कबड्डी या खेळाला खूप जास्त लोकप्रियता मिळाली. कारण 1979 साली अमैच्योर कबड्डी फेडरेशन याच्यामार्फत सुंदर राम यांनी जपानमध्ये लोकांच्या समोर कबड्डी या खेळाला समोर आणले.

आशिया खंडात या खेळाचा प्रचार व्हावा हा त्यांचा हेतू होता. त्यांनी जपानमध्ये या खेळाचा प्रसार केला तेव्हा त्यांना अनेक खेळाडू मिळाले ज्यांनी या खेळाविषयी आपली पसंती दाखवली.

पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा भारत व बांगलादेश या दोन संघांच्या दरम्यान 1979 साली भारतामध्ये खेळला गेला. 1980 मध्ये कबड्डीसाठी आशियाई कपची सुरुवात केली गेली. यामध्ये भारत,बांगलादेश ,जपान, नेपाळ व मलेशिया हे संघ सामील झाले होते. या पहिल्याच आशियाई चॅम्पियनशिप कप मध्ये भारताने बांगलादेशाला अंतिम सामन्यांमध्ये हरवून विजेतेपद मिळवले होते .1990 साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये देखील कबड्डीला स्थान मिळाले होते.

कबड्डी खेळाचे फायदे:-

कबड्डी या खेळामुळे शरीर हे सुदृढ व निरोगी राहते. तसेच कबड्डी खेळण्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते व परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. जे कबड्डी खेळतात त्यांच्या अंगी सामर्थ्य आणि चतुराई निर्माण होते.

कबड्डी हा एक सांघिक खेळ आहे म्हणजे कबड्डी हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे हा खेळ पुरुष व महिला असे दोघेही खेळू शकतात या खेळात 14 खेळाडू असतात म्हणजे प्रत्येक संघामध्ये सात खेळाडू असे दोन संघ असतात हे दोन संघ अँटीस वरील म्हणून ओळखले जातात बचावात्मक बाजूच्या खेळाडूंना म्हणून ओळखले जाते तर विरोधी गटात खेळणाऱ्या खेळाडूंना रेडर म्हणून ओळखले जाते.

कबड्डी खेळाची वैशिष्ट्ये:-

हा खेळ दोन पक्षांमध्ये खेळला जातो. यामध्ये एक पक्ष आक्रमक असतो तर दुसरा पक्ष हा संरक्षक स्वरूपामध्ये असतो. आक्षेपार्य संघामधील एक एक खेळाडू हा संरक्षकाच्या संरक्षणासाठी मैदानात येतो. व त्यानंतर संरक्षणाच्या एकापाठोपाठ एक संरक्षण हे येतच असतात.

आंतरराष्ट्रीय कबड्डी:-

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी संघामध्ये प्रत्येक संघात सात खेळाडू असतात. खेळाचे मैदान हे दोन समान विभागांमध्ये विभागलेले असते पुरुषांच्या खेळाचे कबड्डीचे मैदान हे दहा बाय १३ एवढे असते तर महिला कबड्डी चे मैदान याचे क्षेत्रफळ हे आठ बाय बारा एवढे असते. दोन्ही पक्षांमध्ये तीन अतिरिक्त खेळाडू म्हणजेच एक्स्ट्रा प्लेयर्स हे उपलब्ध असतात. कबड्डी हा खेळ वीस मिनिटांच्या अंतराने खेळला जातो व यादरम्यान खेळाडूंना पाच मिनिटांचा अर्धा वेळ देखील दिला जातो या पाच मिनिटांच्या कालावधीमध्ये दोन्ही टीम आपली कोर्ट बदलतात.

खेळत असताना आक्रमक संघाचा एक खेळाडू हा कबड्डी कबड्डी म्हणून संरक्षण संघाच्या कोर्टामध्ये जातो व याच दरम्यान एखाद्या खेळाडूस संरक्षक टीमच्या कोर्टात जाणे आवश्यक असते आणि त्या संघातील एक किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडूंना शक्य तेवढ्या लवकर त्याच्या दरबारात बोलवणे आवश्यक असते. व जर दम न घेता खेळाडू संरक्षण संघाच्या एका किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडूंना स्पर्श करून आपल्या दरबारात पोहोचला तर त्याच्या संघाला एक किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळतात.

कबड्डी कबड्डी हे फक्त श्वास घेणाऱ्या खेळाडूला सांगावे लागते व त्याच्या कोर्टमध्ये येण्यापूर्वी जर या खेळाडूने श्वास मोडला तर त्याला रेफ्रीद्वारे मैदानाबाहेर काढून टाकले जाते व त्या च्या प्रतिस्पर्ध्या संघाला एक गुण दिला जातो. व याच वेळी संरक्षण संघाचे खेळाडू मैदानामध्ये असलेल्या मध्यभागी काढलेल्या रेष ओलांडू शकत नाहीत.

यासह आणखी एक रेषा ही काढलेली असते जर आक्षेपार्ह संघाचा एखादा खेळाडू त्याच्या दरबारात परत येत असताना त्या रेषेला स्पर्श झाला व त्यानंतर त्याने श्वासोच्छ्वास घ्यायला सुरुवात केली तर त्याला बाद केले जाते. बाद केलेला खेळाडू तात्पुरते मैदानाबाहेर असतो. व जेव्हा आपल्या प्रतिस्पर्ध्याला मैदाना बाहेर पाठविले जाते तेव्हा प्रतिस्पर्धी टीमला एक गुण मिळतो.

कबड्डी खेळाचे नियम:-

  • कबड्डी हा एक अत्याधिक संपर्क खेळ म्हणून ओळखला जातो ज्यामध्ये एखाद्या खेळाडूचा मुख्य उद्देश हा असतो की त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टामध्ये जाऊन त्यांना स्पर्श करणे आणि यशस्वीरित्या त्याच्या दरबारात परत येणे.
  • प्रत्येक सामना हा 40 मिनिट एवढ्या कालावधीचा असतो. यावेळी खेळाडूंनी विरोधी संघाच्या कोर्ट मध्ये रेड टाकायचे असते. व रेड टाकणाऱ्या खेळाडूला रेडर असे म्हटले जाते. एखादा खेळाडू जेव्हा त्याच्या विरोधकाच्या दरबारात प्रवेश करतो त्यालाच रेड करणे असे म्हणतात.
  • व रेडरला हाताळणाऱ्या विरोधी संघातील खेळाडूला डिफेंडर असे म्हटले जाते. वडी सेंटरला त्याच्या स्थानानुसार रेडरला संघाच्या बाहेर कसे काढायचे व आपल्या टीमला गुण कसे मिळवून द्यायचे हे त्याचे काम असते. कोणत्याही रीडरला रेड करण्याची वेळ ही फक्त 30 सेकंदाची असते. वरील रेडरने रेड चालू केला वेळेसच कबड्डी कबड्डी बोलणे हे फार आवश्यक असते. व रीडर प्रतिस्पर्ध्याच्या टीम मध्ये रेड करण्यासाठी गेला तर त्याला पॉईंट मिळवण्यासाठी दोन पर्याय असतात बोनस पॉईंट किंवा स्पर्श बिंदू पॉईंट.

कबड्डी या खेळांमध्ये दिले जाणारे गुण:-

बोनस पॉईंट:-

जेव्हा रीडर डिपेंडिंग कोर्ट मध्ये जातो तेव्हा बोनस लाईनीवर त्याने जर एक पाय हवेत असताना दुसरा पार्ट लाईन वर टिकवला तर त्याला बोनस पॉईंट मिळतो.

टच पॉईंट:-

जेव्हा रीडर आपल्या डिफेंडिंग प्लेयर्स ला किंवा कुठल्याही एका प्लेयरला टच करतो व आपल्या दरबारात पुन्हा परत येतो तेव्हा त्याला टच पॉईंट दिला जातो व प्रतिस्पर्धी टीम मध्ये प्लेयर ज्याला टच केले आहे त्याला कोर्ट मधून बाद केले जाते.

टाकल पॉईंट:-

जेव्हा रेडर प्रतिस्पर्ध्याच्या कोर्ट मध्ये जातो तेव्हा जर डिपेंडिंग टीमने रीडरला 30 सेकंदासाठी आपल्या कोर्टात ठेवले तर रीडरला कोर्टामधून बरखास्त केले जाते.

ऑल आउट:-

जेव्हा एखाद्या संघातील सर्व खेळाडू आपल्या प्रतिस्पर्धी मधील सर्व खेळाडूंना मैदानाबाहेर काढतात तेव्हा त्यांना अतिरिक्त दोन बोनस पॉईंट दिले जातात.

एमटी रेड:-

डिफेंडर ला स्पर्श न करता किंवा बोनस लाईनला देखील स्पर्श न करता खेळाडू फक्त बॅकल लाईन ओलांडल्यानंतर परत आपल्या दरबारात आला तर त्याला असे म्हटले जाते. व एम टी रेड केल्यामुळे कुठल्याही संघाला गुण दिला जात नाही.

डू ओर डाय रेड:-

एखाद्या संघादरम्यान सलग दोन एमटी रेड केल्या व बॅकलाईन ओलांडल्यानंतर रीडर परत आला तर त्यानंतर दु और डाय हे त्यानंतरच्या रेडला म्हटले जाते. व या रेड दरम्यान संघाने बोनस पॉईंट किंवा टच पॉइंट घेणे हे फार आवश्यक असते व खेळाडू जर बोनस पॉईंट किंवा टच पॉईंट न घेता आपल्या दरबारात आला तर रेडरला कोर्टा बाहेर बसविले जाते.

सुपर रेड:-

या रेड मध्ये जर रेडरने तीन किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले तर त्याला सुपर रेड असे म्हटले जाते.

कबड्डी मध्ये गोल्डन रेड:-

जर दोन्ही संघांमध्ये मॅच काय झाली तर यावेळी नाणेफेक होते व नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला ही गोल्डन रेड मिळते. यावेळी बॅकल लाईन लाच बोनस लाईन असे मानले जाते दोन्ही पक्षांना एक एक संधी मिळते व त्यानंतरही त्याची स्थिती ही कायम राहिली तर टॉसच्या माध्यमातून विजेते घोषित केले जातात.

भारतातील कबड्डीचे प्रकार:-

  • संजीवनी कबड्डी
  • जैमिनी स्टाईल
  • अमर स्टाईल
  • पंजाबी कबड्डी

कबड्डीमधील महत्त्वाच्या स्पर्धा:-

  • एशियन गेम्स
  • एशियन कबड्डी चषक
  • कबड्डी विश्वचषक
  • महिलांची कबड्डी
  • प्रो कबड्डी लीग
  • यूके कबड्डी लीग
  • वर्ल्ड कबड्डी लीग

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:-

कबड्डी एका संघात किती खेळाडू असतात?

प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात.

कबड्डी खेळ कधी सुरू झाला?

काही जाणकारांच्या मते कबड्डी हा खेळ भारतात सुमारे 4000 वर्षांपासुन खेळला जात आहे.

हू तू तू म्हणजे काय कोणता खेळ आहे?

अनेक राज्ये कबड्डीला ‘हू तू तू’ असेही म्हणतात

Leave a Comment