क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती Cricket Information In Marathi

Cricket Information In Marathi नमस्कार मित्रांनो अगदी बालपणापासूनच आपल्याला अगदी जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजे खेळ होय. शनिवार-रविवार म्हटलं की पटपट गृहपाठ उरकून रविवारचा वेळ खेळण्यासाठी राखून ठेवला जाई. यातील एक महत्त्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा असा खेळ म्हणजे क्रिकेट होय.

Cricket Information In Marathi
Cricket Information In Marathi

क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती Cricket Information In Marathi

अगदी लिंबू-टिंबु पासून तर जाणत्या किशोरवयीन मुलांपर्यंत सर्वजण रखरखत्या उन्हाची पर्वा न करता आणि भुकेची तमा न बाळगता दिवस-रात्र क्रिकेट खेळत असत. अश्या या सर्वप्रिय क्रिकेट खेळाबद्दल आज आपण माहिती बघूया…

खेळाचे नाव क्रिकेट
खेळाचा प्रकार मैदानी खेळ
खेळाडूंची संख्या11
सामन्याचे प्रकार एकदिवसीय, कसोटी, 20-20
खेळपट्टीची लांबी 22 यार्ड
स्टम्पची उंची आणि रुंदी28 इंच आणि 9 इंच
मैदानाची लांबी 60 यार्ड – 75 यार्ड
बॅटची  लांबी 38 इंच
बॉलचे वजन 155.9 ग्रॅम ते 163 ग्रॅम
क्रिकेटची सुरुवात 16 व्या शतकात

क्रिकेट भारतात फार पूर्वीपासून खेळला जातो. हा अतिशय रोमांचकारी असा खेळ आहे.  गावाकडे या खेळासाठी सुयोग्य असे मैदान कोणी सापडत बसत नाही, अगदी गल्ली, रस्ता, मोकळे शेत या ठिकाणी देखील हा खेळ खेळला जातो.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील क्रिकेटला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. लोकांमध्ये क्रिकेट बद्दल इतके आकर्षण आहे की प्रत्येक वेळी हा सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी स्टेडियम्स खचाखच भरलेली असतात.

तसेच दूरदर्शन वाहिन्यांवर देखील सर्वत्र क्रिकेटच सुरू असते. क्रिकेट हा खेळ मुख्यत्वे करून व्यावसायिक पातळीवर खेळला जाणारा एक मैदानी प्रकारातला खेळ आहे. जो जगभरात बहुतांश देशांमार्फत खेळला जातो. येथे 11-11 खेळाडूंची असे दोन प्रतिस्पर्धी संघ असतात.

cricket information in marathi
Image Credit – Wikipedia

हा खेळ इतका लोकप्रिय आहे की यासाठी नियम आणि कायदे कानून बनविण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि मलबॉर्न क्रिकेट क्लब या दोन आंतरराष्ट्रीय संघटनांची स्थापना केली गेली आहे.

क्रिकेट खेळाचा इतिहास:-

क्रिकेटला अनन्य साधारण असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हा खेळ सर्वप्रथम 16 व्या शतकाच्या दरम्यान दक्षिण इंग्लंडमध्ये खेळला गेला. पुढे त्याचा विकास होत-होत 18 व्या शतकाच्या आसपास तो इंग्लडचा राष्ट्रीय खेळ झाला. पुढे इंग्रज राजवटीत हा खेळ इंग्रजांसोबतच जगभर पसरू लागला.

असे म्हणतात की, 19 व्या शतकात पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला, जो दहा-दहा खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान आयसीसी मार्फत घेण्यात आला. आज मितीस हा खेळ दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि इतरही अनेक देशांमध्ये खेळला जातो.

क्रिकेट खेळाबद्दल प्राथमिक माहिती:-

क्रिकेट हा एक मैदानी प्रकारातला खेळ आहे. यामध्ये बॅट बॉल तसेच स्टंप हे महत्त्वाचे साधने असतात. यांच्याविना क्रिकेट खेळताच येत नाही. मात्र सोबतच हेल्मेट, सूट, पॅड आणि इतरही विविध साधने हा खेळ खेळताना वापरली जातात. हा खेळ 11 खेळाडूंच्या दोन संघात जरी खेळला जात असेल तरी एक अधिकचा बारावा खेळाडूही संघात असतो.

11 सदस्यांपैकी कोणासही दुखापत किंवा इतर कोणत्याही कारणामुळे खेळण्यास अक्षम असेल तर त्याची जागा हा बारावा सदस्य घेऊ शकतो. मुख्यतः या खेळासाठी दोन अंपायर म्हणजे पंच असतात. मात्र काही विशिष्ट परिस्थिती उद्भवल्यास तिसऱ्या पंचाचाही निर्णय विचारात घेतला जातो, जो अंतिम असतो.

या खेळासाठी दोन डाव खेळले जातात. यामध्ये एका संघाकडे फलंदाजी तर दुसऱ्या संघाकडे गोलंदाजी असते. पुढच्या डावात हेच उलट केले जाते. फलंदाजी करणाऱ्या संघाचा मुख्य उद्देश म्हणजे जास्तीत जास्त धावा काढणे आणि खेळाडूंना नाबाद ठेवणे, त्याच वेळी गोलंदाजी करणारा संघ प्रतिस्पर्धी संघाच्या कमी धावा कशा होतील आणि त्यांचे सदस्य बाद कसे करता येतील यावर लक्ष केंद्रित करतो.

डाव बदलल्यानंतर पुढील वेळी फलंदाजी करणाऱ्या संघाचा कल मागील धावात प्रतिस्पर्ध्यांनी केलेल्या धावा पेक्षा अधिक धावा करणे हा असतो तर तसे करू न देणे हा फलंदाजी करणाऱ्या संघाचा कल दिसतो. प्रथम कोण फलंदाजी अथवा गोलंदाजी करणार हा निर्णय नाणेफेक करून ठरविला जातो.

ज्या संघाचा कर्णधार नाणेफेकी जिंकेल त्याला प्रथम निर्णयाचा अधिकार देण्यात येतो तर प्रतिस्पर्धी संघाला त्याचा विरुद्ध खेळावे लागते. क्रिकेटचे मुख्यत्वेकरून कसोटी क्रिकेट, वन डे क्रिकेट आणि T-20 क्रिकेट असे प्रकार पडतात.

क्रिकेट खेळाच्या मैदानाची माहिती:-

क्रिकेटच्या मैदानाला साधारणपणे खेळपट्टी किंवा पिच असे म्हणले जाते. मात्र प्रत्यक्षात दोन विकेट्स अर्थात बॉलिंग क्रिज यांच्यामधील अंतर म्हणजे खेळपट्टी होय. ज्याचे अंतर 22 यार्ड अर्थात 20.12 मीटर एवढे असते तर रुंदी 3.08 मीटर म्हणजे 10 फूट असते.

सामना सुरू झाल्यानंतर पिच/खेळपट्टी बदलण्यास परवानगी नसते. मात्र काही अपरिहार्य कारणाने खेळपट्टी खेळण्यासाठी अयोग्य झाली तर दोनही संघाच्या कर्णधारांच्या संमतीने खेळपट्टी बदलली जाऊ शकते.

क्रिकेटमध्ये विकेट्स म्हणजे काय असते:-

खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना तीन स्टम्प्स आणि दोन बेल्स उभारलेले असतात, त्याला विकेट म्हटले जाते. विकेटची उंची ही 28 इंच तर रुंदी 9 इंच एवढी असते. दोन स्टम्प्स मधून चेंडू विकेट पाडल्याशिवाय पलीकडे जाऊ शकत नाही.

या दोन्ही विकेट्स 20.12 मीटर अंतरावर एकमेकांच्या अगदी समोरच असाव्यात. यातील बेल हे चार इंच रुंद असावी. ज्यावेळी सामन्याच्या दरम्यान जोरदार वारा वाहत असेल तेव्हा पंचांची संमती घेऊन दोन्ही संघांचे कर्णधार बेल्स ठेवायच्या की नाही याबाबत निर्णय घेऊ शकतात.

क्रिकेट खेळाची सीमारेषा:-

खेळपट्टीच्या अगदी मध्यापासून कमीत कमी 60 यार्ड आणि जास्तीत जास्त 75 यार्ड या त्रिज्येचे एक वर्तुळ काढले जाते, हे वर्तुळ म्हणजेच मैदानाची सीमारेषा असते. साधारणपणे ही सीमारेषा चून्याद्वारे आखून त्यावर निशाणे लावली जातात. आज-काल पांढऱ्या रंगाच्या जाड दोऱ्याचा वापर सीमा निश्चितीसाठी केला जातो.

क्रिकेटची बॅट:-

क्रिकेटसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅट होय. बॅटची  लांबी 38 इंचापेक्षा अधिक असू नये. तसेच बॅट ही लाकडापासूनच तयार केलेली असावी असा नियम आहे.

क्रिकेटचा बॉल:-

क्रिकेटसाठी 155.9 ग्रॅम ते 163 ग्रॅम या वजनामधील व 22.4 सेंटीमीटर ते 22.9 सेंटीमीटर या परिघादरम्यानचा चेंडू असावा.

सामन्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या चेंडूला सामन्यापूर्वी दोनही संघाचे कर्णधार व पंच यांची मान्यता लागते.  डाव बदलताना गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार नवीन चेंडू घेऊ शकतो. खेळ सुरू असताना चेंडू हरवला अथवा खराब झाल्यास साधारणपणे पंचांच्या परवानगीने दुसरा चेंडू घेण्यात येतो, मात्र हा चेंडू देखील तेवढाच वापरलेला असावा व त्याची कल्पना फलंदाज करणाऱ्या खेळाडूस दिली जावी. 

खेळ बंद झाल्यानंतर म्हणजे विश्रांतीसाठी, नाश्त्यासाठी, चहा पाणी पिण्यासाठी किंवा खेळ सुरू असताना काही अपरिहार्य व्यत्यय आल्यास या दरम्यानच्या कालावधीत चेंडू हा पंचांच्याच ताब्यात ठेवला जातो.

क्रिकेट खेळाचे नियम:-

क्रिकेट हा खेळ अल्पावधीतच लोकप्रिय झाल्याने अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आज महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे क्रिकेटसाठी नियम असणे सहाजिकच आहे. खाली काही क्रिकेट बद्दल नियम दिलेले आहेत.

-एक दिवसीय क्रिकेट सामना हा पन्नास षटकांचा असावा, सहा चेंडूंचे एक शतक म्हणजेच 300 चेंडूंचा हा सामना असेल.

– पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणारा संघ 300 चेंडू अर्थात 50 षटकांमध्ये शक्य तेवढ्या धावा करून पुढील संघांना लक्ष देतो, तर पुढील डावांमध्ये या धावांपेक्षा अधिक धावा करण्याचे प्रयत्न हा पुढील संघ करत असतो.

– 50 षटक होण्यापूर्वीच जर पहिल्या डावातील संघाचे दहा गडी बाद झाले तर डाव तिथेच संपवला जातो आणि पुढील संघाला फलंदाजीची संधी दिली जाते.

क्रिकेट खेळांमध्ये चौकार, षटकार:-

ज्यावेळी फलंदाज चेंडू टोलावतो मात्र तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या कोणत्याच खेळाडूच्या हाती न लागता सीमा पार करतो तेव्हा त्यास चौकार म्हटले जाते. चौकारासाठी चेंडू हा खेळपट्टीस स्पर्शून गेला तरीही चालतो. चौकार मिळाल्यानंतर फलंदाजाच्या नावे चार धावा होतात.

तर चेंडू टोलावल्यानंतर तो खेळपट्टीस कुठेही स्पर्श न करता सीमे पार गेल्यास त्यास षटकार असे म्हटले जाते, व षटकार साठी त्या संघाला सहा धावा मिळतात. त्याचप्रमाणे जर गोलंदाजाच्या चुकीमुळे जर चेंडू चुकीचा पडला असेल तर फलंदाजाला एक धाव अतिरिक्त दिली जाते.

मित्रांनो क्रिकेट असो किंवा अन्य कुठलाही खेळ, मग तो मैदानी असो किंवा बैठा, आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाते. उत्साहही वाढतो सोबतच मैदानी खेळाने आरोग्य ही सुदृढ राखण्यास मदत होते. तसेच स्पर्धा, ऐक्य, बंधुभाव आणि नेतृत्वगुण यांचाही विकास होतो. त्यामुळे सर्वांनी खेळासही महत्त्व दिले पाहिजे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:-

क्रिकेटच्या मैदानाची लांबी किती असते?

60 यार्ड – 75 यार्ड

क्रिकेट च्या संघात किती खेळाडू असतात?

प्रत्येकी 11 खेळाडू

क्रिकेट हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे?

मैदानी खेळ

Leave a Comment